शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

‘नीट’ सुनावणी गुरुवारी; टांगती तलवार काम

नवी दिल्ली- वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षेबाबत (नीट) सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी गुरुवार, 5 रोजी होणार आहे.
 
राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज (मंगळवार) सुनावणी झाली. याबाबतची पुढील सुनावणी गुरुवारी (5 मे) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. नीट परीक्षेला विविध राज्यांनी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी विरोध केला आहे. नीट परीक्षेची सक्ती मागे घ्यावी यासाठी विविध राज्य आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे.
 
दरम्यान, राज्य सरकारतर्फे घेण्यात येणार्‍या सामाईक प्रवेश परीक्षेची (सीईटी) तयारी अंतिम टप्प्यात असून, ती नियोजनाप्रमाणे येत्या पाच मे रोजी होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातील (डीएमईआर) अधिकार्‍यांनी दिली.
 
राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (नीट) याच वर्षी घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्याच्या ‘सीईटी’बाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निङ्र्काण झाली होती. पण, राज्यात ‘सीईटी’ होणारच अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्या पाश्र्वभूमीवर पुण्यात ‘सीईटी’ची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.