गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 30 जानेवारी 2015 (10:29 IST)

‘पंढरीची वारी’ला बहुमान

प्रजासत्तादिनी राजपथावर सादर झालेल्या ‘पंढरीची वारी’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशातील सर्वोत्तम चित्ररथाचा बहुमान जाहीर झाला आहे.  या सन्मानामुळे राज्याने सहाव्यांदा प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे.

देशातील २५ चित्ररथांमधून ‘पंढरीची वारी’ या चित्ररथाची प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आल्याचे संरक्षण विभागाच्या परीक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केले. नागपूरच्या  लेझीम नृत्यालाही बक्षिस जाहीर झाले आहे.  केंद्रीय मंत्रालयाच्या ९ आणि विविध राज्यांतील १६ चित्ररथांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.