गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (11:03 IST)

शाकंभरी पौर्णिमा पूजा विधी, हा विशेष मंत्र लाभ देईल

पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणार्‍या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय. तिला हजारो डोळे होते म्हणून शाकंभरी असे नाव पडलं. मान्यतेनुसार दुर्गा देवीने मानव कल्याणासाठी शाकंभरी अवतार घेतला होता. याला आदिशक्तीचे सौम्य रुप देखील म्हटलं जातं. देवीने पृथ्वीवर अकाल  आणि गंभीर खाद्य संकटापासून मुक्तीसाठी अवतार घेतले होते म्हणून अन्नपूर्णा देवी या रुपात देखील या देवीची आराधना केली जाते. फळं आणि भाज्यांने देवीची पूजा केली जाते. या दिवशी गरजू लोकांना धान्य, फळं आणि भाज्या दान केल्याने पुण्य प्राप्ती होते आणि देवी प्रसन्न होते.
 
पूजन विधी
या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. देवीची आराधना करावी आणि नंतर विधीपूर्वक देवीची पूजा करावी. देवीची स्थापना करुन पूजा आणि आरती करावी. देवीला ताजे फळं आणि भाज्यांचे नैवेद्य दाखवावे आणि गंगा जल शिंपडावे. नंतर मंदिरात जाऊन प्रसाद दाखवावा आणि गरजू लोकांना दान करावे. या दिवशी शाकंभरी देवीची कथा करावी.
 
या मंत्राने करा जप
शाकंभरी पौर्णिमेला शुभ मंत्र जपणे फलदायी मानले गेले आहे. या दिवशी 'शाकंभरी नीलवर्णानीलोत्पलविलोचना। मुष्टिंशिलीमुखापूर्णकमलंकमलालया।।' या मंत्राचा जप करावा.