मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

अभिजित मुहूर्तात कलश स्थापना करावी!

WD
हस्त नक्षत्रात नवरात्रीचे शुभारंभ

शारदीय नवरात्री 28 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. प्रतिपदा तिथी दुपारी 12.45 पर्यंत राहणार आहे. त्याच बरोबर सर्वार्थ सिद्धी योग स्थापनेच्या दिवशी दुपारी 1.37 पर्यंत राहणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर असा योग जुळून आला आहे, जेव्हा चंद्र प्रधान हस्त नक्षत्रात नवरात्रीचे शुभारंभ होत आहे. हा योग भक्तांसाठी उत्तम आणि लाभदायी ठरणार
आहे.

कलश स्थापना यंदा सकाळी 9.34 ते 12.24 पर्यंत अभिजित मुहूर्तात होईल आणि 5 ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीचे समापन होणार आहे. द्वितीया आणि तृतीया 29 सप्टेंबरला रिक्ता तिथीत येत आहे. त्याने नवरात्री यंदा 8 दिवसांची असेल. ज्योतिषानुसार 29ला सकाळी 9.02 मिनिटापर्यंत द्वितीया तिथी आहे. त्यानंतर तृतीया तिथी सुरू होत आहे, जी 30 सप्टेंबरला सूर्य उदय होण्याअगोदर सकाळी 5.32पर्यंत राहणार आहे. त्याने दोन तिथींचे संयोग 29 ला होत आहे.


शुभदायक असेल पंचमी

या वर्षी नवरात्रातील पंचमी 1 ऑक्टोबरला अनुराधा नक्षत्रात सुरू होत आहे. हा नक्षत्र शनी प्रधान असल्यामुळे पंचमीची महत्ता प्रभावकारी आणि शुभ फलकारी असेल. पंचमीला उपास करणाऱ्या उपासकांनी रात्रीत देवीचा शृंगार आणि आराधना केल्याने त्यांना प्रत्येक सुख मिळेल.