शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

कोल्हापुरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

WD
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून मंदिराची साफ सफाई आणि रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर आणि मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे महालक्ष्मी मंदिर परिसर न्हाऊन निघाला आहे. महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भक्त मोठ्या संख्येने महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी येतात.दरम्यान, नवरात्रोत्सवात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि घातपाती कारवायांच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षेसाठी यंदा महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. मंदिरात प्रवेश करणा-या प्रत्येक भाविकाचे यात चित्रीकरण केले जाईल. या यंत्रणेची जबाबदारी सुरक्षा एजन्सीकडे दिली असून, ५० लाख रुपये किमतीची दोन मशीन नवरात्रोत्सवापूर्वी मंदिरात कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी यापूर्वीच दिली आहे.