शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

जगदंबेचा नवरात्रौत्सव

WD
महाराष्ट्रात चैत्र व फाल्गुन या मराठी 12 महिन्यांच्या काळात चार वेगवेगळी नवरात्रे साजरी केली जातात.

देवीचा उत्सव वर्षातून दोनवेळा साजरा करण्याची ही प्रथा अगदी वेदकाळापासून चालत आली आहे. चैत्रीपोर्णिमा आणि जयादशमीला असा दोनवेळा साजरा केला जाणारा हा उत्सव शेतकर्‍यांच्या कामाशी निगडित आहे. रब्बीचा हंगाम सुरू झाला की चैत्रातील उत्सव आणि खर‍िपचा सुगीचा हंगाम सुरू झाला की, नवरात्रौत्सव.

शेतीची कामे संपली की शेतकर्‍यांना उत्साहाने या उत्सवात सहभागी होता यावे, अशी या मागील संकल्पना. याच नऊ दिवसांत दररोज माळ चढवली जाते.

देवीच्या उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीची उपासना केली जाते. सरस्वती, दुर्गा, काली ही स्त्रीशक्तीची प्रमुख रूपे. महन्मंगल मातृरूप पार्वती, कलासक्त गौरी अशा अनेक रूपात तिची आराधना केली जाते. संपूर्ण भारतवर्षात देवीची 51 शक्तिपीठे असून त्यापैकी साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत.

कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहुरगहची रेणुका ही तीन पूर्ण पीठे व वणीची सप्तश्रृंगीनिवासिनी हे अर्धपीठ. महिषासुराचा वध केल्यानंतर काही काळच आदिशक्ती येथे विसावली होती. म्हणून हे अर्धेपीठ मानले जाते.