गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By वेबदुनिया|

दह्यातील साबूदाणा

साहित्य : एक वाटी साबूदाणा, मीठ, तीन-चार ओल्या मिरच्या, अर्धी वाटी दाण्याचे कूट, साखर, कोथिंबीर, दोन वाट्‍या गोड ताक, एक वाटी गोड सायीचे दही, तूप. 
 
कृती : साबूदाणा प्रथम भाजून घेऊन, धुऊन टाकावा व तो ‍ताकात भिजवून, थोडा वेळ तसाच ठेवावा. तुपात जिरे व मिरच्यांचे टुकडे घालून फोडणी करावी. भिजवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये वरील फोडणी, तसेच चवीप्रमाणे मीठ, साखर आणि दाण्याचे कूट घालावे आणि दही घालून साबूदाणा चांगला कालवावा.