गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|
Last Updated : शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (16:01 IST)

नवार्ण मंत्र

नवरात्र हे 'शक्ती' उपासनेचे पर्व आहे. नवरात्रौत्सवात ब्रह्मांडातील सर्व ग्रह एकत्र येऊन सक्रिय होतात व त्याचा विपरित परिणाम मुक प्राण्यांवर होतो. ग्रहांच्या दुष्परिणामांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी नवरात्रौत्सवात आदी शक्तीची पूजा केली जाते. 

आदीशक्ती दु:खांचा नाश करणारी माता आहे. त्यामुळे नवरात्रात आदीशक्तीची पूजा मनोभावे केली जाते. देवीच्या नऊ शक्ती जागृत हो़ऊन नवग्रहांना आमंत्रित करतात. त्यामुळे मुक्या प्राण्यांवर ग्रह दया करून त्यांना सोडून देतात.

देवीच्या या नऊ शक्ती जागृत करण्यासाठी 'नवार्ण' मंत्राचा जप करावा लागतो. नव म्हणजे नऊ व अर्ण म्हणजे अक्षर. नवार्ण मंत्र अर्थातच नऊ अक्षरी आहे. नवार्ण मंत्र पुढील प्रमाणे-'ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे' या मंत्रातील एक-एक अक्षराचा संबंध आदीमातेच्या एक-एक शक्तिशी आहे. त्याचप्रमाणे एक-एक शक्तिचा संबंध एक-एक ग्रहाशी आहे.

नवार्ण मंत्रातील नऊ अक्षरामधील पहिले अक्षर 'ऐ' आहे. तो सूर्य या ग्रहाला आमंत्रित करतो. तसेच 'ऐं' या अक्षराचा संबंध दुर्गादेवीची पहिली शक्ति 'शैल पुत्री'शी आहे. त्यामुळे तिची उपासना नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजे प्रथम दिवशी केली जाते. दूसरे अक्षर 'ह्रीं' आहे. तो चंद्र या ग्रहाला आमंत्रित करतो. तसेच त्याचा संबंध दुसरी शक्ति 'ब्रह्मचारिणी'शी आहे. तिची पूजा दुसर्‍या दिवशी केली जाते.

त्याप्रमाणे तिसरे अक्षर 'क्लीं' आहे, चौथे 'चा', पाचवे 'मुं', सहावा 'डा', सातवा 'यै', आठवा 'वि' तसेच नववा 'चै' आहे. ते क्रमशः मंगळ, बुध, बृहस्पति, शुक्र, शनि, राहु व केतु या ग्रहाना नियंत्रित करतात.

  ND
या अक्षरांच्या संबंधित दुर्गामातेच्या चंद्रघंटा, कृष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी व सिद्धिदात्री या शक्ति आहेत. त्याची आराधना नवरात्रीमध्ये तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी केली जाते. या 'नवार्ण' मंत्राचे ब्रह्मा, विष्णु व महेश हे तीन देव तर महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती ह्या त्यांच्या तीन देव्या आहेत. आदीशक्ती दुर्गामातेच्या या नऊ शक्ति धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थाची प्राप्‍ती करण्यातही सहाय्यक ठरतात.

'नवार्ण' मंत्राचे 108 वेळा जप दिवसातून किमान तीन वेळा केला पाहिजे. विजयादशमीच्या दिवशी या नऊ अक्षरी नवार्ण मंत्राच्या आधी ॐ हे अक्षर जोडून या दशाक्षरी मंत्र दुर्गा सप्तशतीमध्ये देण्यात आला आहे. मात्र, या मंत्रात ॐ हे अक्षर जोडल्याने मंत्राच्या प्रभावावर कुठलाही परिणाम होत नाही.