शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

श्री रेणुका मातेचा जोगवा

WD
माहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास ।
भक्त येती ते दर्शनास ॥ धृ॥

पिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टीदार
अंगी चोळी ती हिरवीगार ।
पितांबराची ग पितांबराची खोविली कास ॥ भक्त येती ॥

बिंदी बिजवरा गं बिंदी बिजवरा गं भाळी शोभे ।
काफ बाल्याने कान ही साजे ।
इच्या नथेला ग इच्या नथेला ग हिरवे घोस ॥ भक्त येती ॥

सरीठुसीत गं सरीठुसीत मोहनमाळ ।
जोडवे मासोळ्या पैंजन चाळ ।
पट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा शोभे कमरेस ॥ भक्त येती ॥

जाईजुईची गं जाईजुईची आणिली फुले ।
तुरे हार माळीने गुंफीयेले ।
गळा शोभे तो गं रुप शोभे तो गं । आनंदास ॥ भक्त येती ॥

हिला बसायला गं हिला बसायला चांदीचा पाट ।
हिला जेवायला चांदीचे ताट ।
पुरण पोळीची ग पुरण पोळीची आवड सुरस ॥ भक्त येती ॥

मुखी तांबुल पाचशे पानांचा ।
मुखकमली रंग लालीचा ।
खणानारळाची खणानारळाची ओटी तुला ॥ भक्त येती ॥

विष्णुदासाची गं विष्णुदासाची विनवणी तुला ।
माझ्या जनार्दनी चरणी माता भगिनींना गं माता भगिनींना सौभाग्यदायी
व्हावे अखंड अखंडीत पावनी
सदा उधळती गं सदा उधळती गं हळदीला ॥भक्त येती ॥