गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2015 (11:42 IST)

11 सप्टेंबरपासून आयफोन 6s, प्लसचे बुकिंग

अँपलटा मोस्ट अवेटेड आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लसबद्दल एक नवीन बातमी आलीय. कंपनी 11 सप्टेंबरपासून आयफोन 6s, आयफोन 6s प्लस ऑनलाईन लिस्ट करू शकते. 
 
फ्रान्सची वेबसाइट Mac4Ever नुसार अँपल आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लस लॉन्च करणार आहे आणि अँपलनं आपल्या कर्मचार्‍यांना तसं सांगितलंय. दोन्ही अपकमिंग फ्लॅगशिप 11 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी ऑनलाईन उपलब्ध असेल. गेल्या काही वर्षापासून अँपल सप्टेंबरच्या सुरुवातीलाच आयफोनसाठी इव्हेंटचं आयोजन करतं आणि यावेळी हे दोन नवे मॉडेल अँपल 9 सप्टेंबरला लॉन्च करू शकतात. 
 
खास फीचर्स लीक रिपोर्टनुसार आयफोन 6s आणि 6s प्लसमध्ये 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे. सोबतच कॅमेरा 4k व्हिडिओ रेकॉर्ड करू शकेल. फोनमध्ये आधीपेक्षा फास्ट असा 4G फोर्स टच डिस्प्ले, अगोदरपेक्षा चांगला असेल- 9d क्वाडकोर प्रोसेसर, 2जीबी रॅम मेमरी, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, 16 जीबी आणि 32 जीबी मेमरी व्हर्जन असेल.