गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2015 (12:23 IST)

13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा स्मार्टफोन

तैवानमधील ‘आसूस’ कंपनीचा बहुप्रतीक्षित ‘झेनफोन सेल्फी’ हा स्मार्टफोन तैवानमध्ये लॉन्च करण्यात आला. हे लॉन्चिंग कॉम्युटेक्स 2015 मध्ये करण्यात आले. सेल्फीची वाढती लोकप्रियता पाहता स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा जास्त मेगापिक्सचा असावा या संकल्पनेतून ‘झेनफोन सेल्फी’ या स्मार्टफोनला तब्बल 13 मेगापिक्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 
 
झेनफोनची वैशिष्टय़े : 
 
5.5 इंचाच्या स्क्रीनचा झेनफोन सेल्फी  
 
अँड्रॉईडची अद्ययावत 5.0 लॉलीपॉप प्रणाली 
 
स्क्रीनला ओरखडय़ांपासून बचावासाठी गोरीला ग्लास
 
रॅमच्या बाबतीत 2 आणि 3 जीबी असे दोन पर्याय
 
13 मेगापिक्सलचा ङ्ख्रंट कॅमेरा याच वैशिष्टय़ामुळे वेगळा
 
झेनफोन सेल्फीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.