शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 एप्रिल 2015 (10:32 IST)

60 सेकंदात स्मार्टफोन चार्ज करणारी नवी बॅटरी

एकदा आयफोन 6 चार्ज करण्यासाठी आपल्याला दोन तास चार्जिगची आवश्यकता असते. पण आता अशा एका अँल्युमिनिअम बॅटरीचा शोध लागला आहे, की ज्यामुळे हा फोन केवळ साठ सेकंदात म्हणजे एका मिनिटात चार्ज होऊ शकतो.

स्टँडफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी अशी एक अँल्युमिनिअम बॅटरी शोधली आहे, त्याच्या साहाय्याने आपण कोणताही फोन केवळ एका मिनिटात संपूर्ण चार्ज करू शकतो. ही बॅटरी बाजारात आली तर एकूण मोबाइल इंडस्ट्रीत क्रांती होऊ शकते. या नव्या बॅटरीच्या साहाय्याने आपण फोन, लॅपटॉप, टॅबलेट शून्य ते 100 टक्के चार्जिग केवळ 60 सेकंदात करू शकणार आहोत.

ही बॅटरी सध्याच्या लिथिअम बॅटरीच्या सात पट जास्त चालणारी आहे. सध्याची आपण वापरणारी बॅटरी 1 हजारवेळा रिचार्ज करू शकतो. तर ही नवीन बॅटरी 7500 वेळा चार्ज करू शकतो. सध्याच्या बॅटरीला लागण्यार्‍या व्होल्टेजपेक्षा निम्म्या व्होल्टेजमध्ये चार्ज होते. यापेक्षाही चांगले आउटपुट देण्याची हमी शास्त्रज्ञांनी दिली आहे.