शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

ब्लॅकबेरीचा DTEK60 बाजारात दाखल

स्मार्टफोन  जगातील सर्वाधिक विश्वसनीय असलेली  ब्लॅकबेरीने आपला तिसरा अँड्रॉईड स्मार्टफोन DTEK60  बाजारात दाखल केला आहे. हा फोन इतर स्पर्धक जसे अॅपल आयफोन 7 आणि गूगलच्या पिक्सेल डिव्हाईसपेक्षाही स्वस्त असा हा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 499 डॉलर म्हणजे सुमारे 33 हजार रुपये आहे. ब्लॅकबेरीचा हा शेवटचा स्मार्टफोन असणार असून आता ब्लॅकबेरीफक्त  इतर कंपन्यांना  त्यांनी  सुरक्षा  प्रणाली देणार    आहे.  फोन    विक्रीतून   आता  ब्लॅकबेरीला   मोठे  नुकसान   होत   असलेले समोर   आले आहे.
 
या फोन मध्ये आता फिंगरप्रिंट सेन्सर  दिला आहे. फोनची स्क्रीन साईज 5.5 आहे. यामध्ये वेगवान असा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर बसविला आहे. यामध्ये 4 जीबी रॅम असून सुमारे  21 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा तर 8 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. टाईप-सी यूएसबी पोर्ट सोबत नवीनतम अशी मार्शमॅलो 6.0 बसविली आहे.