बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 22 एप्रिल 2015 (11:23 IST)

HTC ने लॉन्च केला तीन कॅमेरे व FST प्रोसेसर असलेला One M9+

HTC ने One M9+ आणि One E9+ हे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले. One M9+ ची किंमत सुमारे 52,250 रुपये आहे. तीन कॅमेर्‍यांनी हा स्मार्टफोन अद्ययावत आहे. त्यापैकी दोन रिअर, आणि एक फ्रंट कॅमेरा आहे. त्यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच दोन्हीमध्ये अँड्राइडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमने अद्ययावत आहेत. HTC च्या दोन्ही लेटेस्ट फोनचा रियर कॅमेरा 20 मेगापिक्सल आहे.

HTC One M9+ मधील फीचर्स:

* फिंगरप्रिंट सेंसर- One M9+ हा लेटेस्ट फोन ‘फिंगरप्रिंट सेंसर’सह चायना मार्केटमध्ये सादर केला आहे. यापूर्वी अँपल आणि सॅमसंगच्या मोबाइलमध्ये ‘फिंगरप्रिंट सेंसर’ देण्यात आले होते.

* डिस्प्लेस- One M9+ मध्ये 5.2 इंचाचा स्क्रीन, फुल एचडी डिस्प्ले क्वालिटी (1440X 2560 पिक्सल रेझोल्युशन)

* ऑपरेटिंग सिस्टम- अँड्रॉइड लॉलीपॉप व्हर्जन 5.0.2 सेंस यूजर इंटरफेसने अद्ययावत

* प्रोसेसर आणि मेमरी- 2.2 GHz चे मीडिया टेक MT 6795T ( Helio X) ऑक्टा कोर प्रोसेसर, 3GB रॅम, 32 GB ची इंटरनल मेमरी. 128 GBपर्यंत मेमरीची सुविधा

* कॅमेरा- 20 मेगापिक्सल क्षमतेचा रियर कॅमेरा, सेल्फी, व्हिडिओ कॉलिंगसाठी 4 मेगापिक्सल अल्ट्रापिक्सल कॅमेरा



HTC One E9+ चे फीचर्स

* डिस्प्ले- 5.5 इंचाचा स्क्रीन, 1440X2560 पिक्सलचे रेझोल्युशन, 534 पिक्सल प्रती इंचाची डेन्सिटी, मल्टीटच सपोर्ट करणारा स्क्रीन कॉर्निग गोरिल्ला ग्लास 4 प्रोटेक्शन

* ऑपरेटिंग सिस्टम- अँड्रॉइड लॉलीपॉप व्हर्जन 5.0

* प्रोसेसर आणि मेमरी- 2GHz चे ऑक्टा-कोर प्रोसेसर (मीडियाटेक MT 6795 M2 चिपसेट), ग्राफिक्स सपोर्टसाठी PowerVR G6200 ग्राफिक्सल प्रोसेसर, 2GB रॅम, 32GB इंटरनल मेमरी. 128GB पर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा

* कॅमेरा- सेल्फी, व्हिडिओ कॉलिंगसाठी 4 मेगापिक्सल अल्ट्रापिक्सल कॅमेरा, 20 मेगापिक्सल रियर कॅमेरा विथ ऑटोफोकस LED फ्लॅश.