शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (15:33 IST)

नोकिया 3310 बाजारात दाखल

नोकिया कंपनीने 3310 या मोबाईल हँडसेटला नव्या स्वरुपात ग्राहकांसाठी बाजारात आणलं आहे. सोबतच नोकिया 5, नोकिया 6, नोकिया 3 चे नवे मॉडेल लाँच केले आहेत. स्पेनमधील बार्सिलोनात झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस या टेक इव्हेंटमध्ये हे फोन लाँच करण्यात आले.
 
नोकिया 3310 मध्ये 2.4 इंचाची कव्हर्ड स्क्रीन आणि बटन असलेला की-बोर्ड असणार आहे. 2 मेगापिक्सलचा फ्लॅश लाईट कॅमेरा, हेडफोन, ड्युअल सिम, एफएम रेडियो, 16 एमबी इंटरनल स्टोरेज क्षमता जी 32 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या मोबाईलची बॅटरी 1200 mAh क्षमतेची आहे. ही बॅटरी 22 तासांचा टॉक टाईम बॅकअप देते, असा कंपनीचा दावा आहे. नवीन नोकिया 3310 मध्ये आता कलर डस्प्ले देण्यात आला आहे. 2.4 इंच आकाराच्या या डस्प्लेमध्ये विविध प्रकारचे वॉलपेपर देण्यात आले आहेत. नव्या मॉडेलमध्ये कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रायमरी कॅमेऱ्याचा वापर करता येईल. मात्र यामध्ये फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला नाही. सर्वात आवडत्या स्नेक गेमचा या फोनमध्ये पुन्हा या फोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. मल्टीकलरमध्ये गेम या फोनमध्ये देण्यात आली आहे.