गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

1 एप्रिलपासून टॅरिफनंतर देखील वॉयस कॉल आणि रोमिंग राहील फ्री : मुकेश

मुकेश अंबानी यांनी मंगळवारी रिलायंस जियोला घेऊन मोठे निर्णय घेतले आहे. त्यांनी सांगितले की फारच जलद गतीने ग्राहक जिओशी जुळले. कस्टमर्सने बरेच रेकॉर्ड्स देखील बनवले. मागील महिन्यात जिओ युजर्सने 100 कोटी गीगाबाईट्स डेटा यूज केला. भारत, मोबाइल डेटा यूज करण्यात जगात नंबर वन आहे." सांगायचे म्हणजे की मुकेश यांनी मागील वर्षी एक सप्टेंबरला रिलायंस जिओची 4G सर्विस लाँच केली होती. मुकेश अंबानी यांच्या स्पीचचे ठळक मुद्दे ...
 
- "फक्त 6 महिन्यात भारत आणि भारतीयांनी साबीत केले आहे की ते जगातील कुठल्याही देशाच्या तुलनेत तेज आणि जास्त डेटा यूज करू शकतात."
- "कस्टमर्सला फार फार धन्यवाद "
- "जिओहून प्रत्येक मिनिटात 2 कोटी वॉयस कॉल करण्यात आले."
- "रिलायंस जिओ कस्टमर्सची संख्या 10 कोटीपेक्षा जास्त पोहोचली आहे."
- "रिलायंस जिओ डेटा वापरामध्ये जगातील नंबर वन बनला आहे."
- "1 एप्रिलपासून जिओ टॅरिफ प्लानची सुरुवात करेल. टॅरिफनंतर देखील वॉयस कॉल आणि रोमिंग फ्री असेल."
- 31 मार्चला जिओचा फ्री डेटा बंद, 1 एप्रिलपासून नवे दर लागू.
- गेल्या महिन्यात जिओ वापरकर्त्यांनी 100 कोटी जीबीहून जास्त डेटा वापरला, जगात भारत आता मोबाईल डेटा वापरण्यात  पहिल्या क्रमांकावर आहे - मुकेश अंबानी.
 
 मार्चपासून जिओ प्राइममध्ये मेंबरशिप प्लान
- मुकेश यांनी 1 मार्चपासून जिओ प्राइम मेंबरशिप प्लानचे एलान केले आहे.   
- त्यांनी सांगितले की, "99 रुपयांमध्ये एक वर्षासाठी जिओ प्राइम मेंबरशिप देईल. प्राइम मेंबर्ससाठी 303 रु. चा प्लान दिला जाईल."
- "प्राइम मेंबर्सला जिओ मीडिया बुके मिळेल. त्यांना एक वर्षासाठी आणि न्यू ईअर ऑफर अर्थात फ्री सर्विस मिळेल."
 
मुकेश यांनी म्हटले होते की - जिओमध्ये अधिक इन्वेस्टमेंट होईल  
 
- मुकेश यांनी या गोष्टीचे संकेत दिले होते की येणार्‍या काळात ते जिओमध्ये अधिक इन्वेस्टमेंट करतील. 1.7 लाख कोटीचा इन्वेस्टमेंट झालेला आहे.  
- जानेवारीमध्ये कंपनीच्या बोर्डाने 30 हजार कोटी अप्रूव्ड केले होते. म्हटले होते की या पैशांचा वापर नेटवर्क वाढवण्यात आणि  कवरेज-कॅपेसिटीला दुरुस्त करण्यासाठी होईल.  
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओची लाँचिंगच्या वेळेस मुकेश यांनी 10 कोटी सब्सक्राइबर्सपर्यंत पोहोचण्याच्या टार्गेटची गोष्ट केली होती.   
- कंपनीच्या ऑफिसरांचे एकले तर 6 महिन्याच्या कमी वेळेत जियोने 10 कोटी सब्सक्राइबर्सचे टार्गेट पूर्ण केले आहे.  
- काही कंपन्यांनी जिओच्या फ्री सर्विसबद्दल चॅलेंज केले होते. खास करून या गोष्टीवर की रिलायंसने मार्चपर्यंत जिरो कॉस्टवर   डाटा देण्याचा वादा केला होता.  
- भारती एंटरप्राइजेजचे चीफ सुनील मित्तल यांनी म्हटले होते की, "जिओचे फ्रीमध्ये सर्विस देणे दुसर्‍या कंपन्यांच्या बिझनेसला नुकसान पोहचवत आहे."
- नुकतेच वोडाफोन आणि आयडियाने मर्जरचा ऍलन केला होता.  
- तसेच, जिओने दुसर्‍या कंपन्यांवर आरोप लावला आहे की ते योग्य प्रकारे नेटवर्क प्रोवाइड नाही करू शकत आहे. यामुळे कॉल फेल्योर होतात.