बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जानेवारी 2017 (00:15 IST)

अवघ्या ९९९ व १५०० रुपयात फिचर फोन

रिलायन्स जिओने कमी किमतीतले ‘फिचर फोन’ बाजारात आणण्याची तयारी केली आहे. या फोन मध्ये व्हीओएलटीई कॉलींगची सुविधा असून जिओचे ४ जी सिम त्यात चालू शकणार आहे. या फोनचा एक फोटो सध्या सोशल मीडियाच्या माध्यतातून फिरत असून त्यावर जिओ म्युझिक, जिओ सिनेमा अशी चार बटने अतिरिक्त दिलेली आहेत. दोन प्रकारात उपलब्ध असलेला हा फोन ९९९ व १५०० रुपये अशा दोन पर्यायात उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जातेय. 
 
जिओचा १४९ चा दरमहाचा कमी किंमतीचा डाटा व कॉलिंग प्लॅन आहे. ज्यांना अमर्याद बोलण्याची गरज असते, त्यांच्यासाठी हा प्लॅन फायद्याचा असून कमी किंमतीचा जिओ फोन व प्लॅन सामान्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. देशात अनेकांकडे स्मार्टफोन असले तरी आजही, किमान ४ हजार रुपयांना मिळणारे ४ जी स्मार्टफोन अनेकांना परवडत नाहीत. त्यांच्यासाठी हा फिचर फोन उपयुक्त ठरणार आहे.