testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सॅमसंग गॅलॅक्सी A7 (2018) सह अनेक सॅमसंग फोन्स स्वस्त

Samsung galaxy A7 (2018)
सॅमसंग बेस्ट डेज सेल 6 डिसेंबर रोजी सुरू झाली आणि ती 31 डिसेंबरपर्यंत कायम राहील. ग्राहकांना सॅमसंग बेस्ट डेज सेल दरम्यान एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. या ऑफरचे फायदे सॅमसंग गॅलॅक्सी नोट 9, गॅलॅक्सी S9+ आणि गॅलॅक्सी A9 (2018) स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. याशिवाय गॅलॅक्सी A7 (2018) विशेष किमतीवर विकत घेण्याची संधी असेल. ईएमआय पर्यायाव्यतिरिक्त, एचडीएफसी बँक कार्डाद्वारे पैसे भरण्यावर देखील कॅशबॅक मिळत आहे.
सॅमसंग बेस्ट डेज सेल कंपनीच्या सॅमसंग इंडिया ई-स्टोअर व्यतिरिक्त, सॅमसंग स्मार्ट कॅफे आणि इतर ऑनलाईन किरकोळ स्टोअरवर देखील चालू आहे. लक्षात ठेवा, सॅमसंग गॅलॅक्सी A7 स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये 23,909 रूपयांमध्ये लॉच करण्यात आला होता. ही किंमत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी वेरिएंटची आहे. त्याच वेळी त्याची 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,990 रुपये होती. सॅमसंग सेलमध्ये सॅमसंग सेलमध्ये गॅलॅक्सी A7 (2018) 23,909 रुपये किमतीऐवजी 21,990 रुपयेच्या विशेष किमतीवर मिळत आहे.
गॅलॅक्सी J8 ची किंमत तर 17,990 रुपये आहे परंतु आता हा स्मार्टफोन सॅमसंग बेस्ट डेज सेलमध्ये 15,990 रुपयांच्या विशेष किमतीवर विकला जात आहे. ऍमेझॉन.इन आणि फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलॅक्सी J8 या आठवड्याच्या सुरुवातीलाच नवीन किंमतींसह सूचीबद्ध करण्यात आला. सॅमसंगचे फ्लॅगशिप स्मार्टफोन सॅमसंग गॅलॅक्सी नोट 9 आणि गॅलॅक्सी S9+ वर 9,000 रूपयांचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. सॅमसंगच्या पहिल्या फोर रीअर कॅमेरा स्मार्टफोन गॅलॅक्सी A9 (2018) वर 4,000 रूपयांचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. सॅमसंग बेस्ट डेज सेलमध्ये ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी सॅमसंग इंडिया ई-स्टोअरला भेट द्या.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

ठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा

national news
पावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार ...

महावितरणच्या 'या' सेवेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

national news
पुणेकरांनी महावितरणकडे मोबाइलची नोंदणी करून ‘एसएमएस’द्वारे वीजबिल आणि इतर माहितीची सुविधा ...

'ती' मनीऑर्डर आली परत

national news
नाशिकमधील निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्यांने लिलावासाठी आणलेल्या कांद्याला ...

मुख्यमंत्री यांचा दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद

national news
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटोल तालुक्यातील कोंडासावळी गावाला भेट दिली. या ...

शेतकऱ्यांना मदत याच पवार साहेबांसाठी वाढदिवस शुभेच्छा - ...

national news
महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या भीषण संकटामुळे चिंतेत आहे. पाण्यासाठी दुष्काळग्रस्त जनता ...