शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

सॅमसंगकडून गॅलक्सी नोट ७ मधील स्फोटाची कारणे स्पष्ट

सॅमसंगकडून आता  गॅलक्सी नोट ७ मधील स्फोटाची कारणे  स्पष्ट करण्यात आली आहेत. फोनमधील दोष आणि अंतर्गत कारणांमुळे बॅटरी स्फोटाची समस्या उद्भवली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. या स्फोटामागे इंटर्नल शॉर्ट-सर्किटची समस्या देखील कारणीभूत असल्याचे सॅमसंगने स्पष्ट केले आहे.

मुळात गॅलक्सी नोट ७ हा अतिशय स्लिम होता. तसेच याचे कोपरे चारही बाजूने वक्रावार होते. जेव्हा हा फोन चार्ज केला जायचा तेव्हा बॅटरी गरम व्हायची आणि तिला पसरायला जागा न मिळाल्याने तिचा स्फोट व्हायचा असे समोर आले.