शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 28 ऑक्टोबर 2014 (15:24 IST)

अँडकॉमचा स्वस्त अन् मस्त किटकॅट ए३५

वाजवी दरातील व तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट उत्पादनाच्या आपल्या रेंजसह भारतात टेलिकॉम व आयटी क्रांतीला प्रथमच सादर करणारी कंपनी अँडकॉमने आपली नवीन बजेट अँण्ड्राईड ४.४ किटकॅट सीरिज अँडकॉम किटकॅट ए३५ बाजारात आणला आहे. अँडकॉमचा ए३५ २७९९ रुपये (एमआरपी-४ हजार रुपये)च्या सवरेत्तम किमतीमध्ये उपलब्ध आहे. जो उत्कृष्ट दर्जाचे सादरीकरण व भव्य अँण्ड्राईड अनुभव सादर करण्यासह एक परिपूर्ण बजेट अँण्ड्राईड स्मार्टफोन आहे. 
 
अँडकॉम किटकॅट ए३५ मध्ये ३.५ इंच एचव्हीजीए डिस्प्ले आहे आणि २५६ एमबी रॅम व ५१२ इंटरनल स्टोरेज आहे, जे अँण्ड्राईड फोन्समधील लवचीकतेच्या गरजेसाठी मायक्रो एसडी कार्डसह ३२ जीबीपर्यंत विस्तारित करता येऊ शकते, यासह हा १.२ गिगाहर्ट्झ प्रोसेसरने सर्मथित आहे. याव्यतिरिक्त, प्रगत फोटो गुणवत्तेसह २ मेगापिक्सल रीअर कॅमेरा व १.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. १४00 एमएएच बॅटरीच्या शक्तीने चलित, फोन ३जी नेटवर्कसह ड्युएल सिम कनेक्टिव्हिटी आणि विविध कनेक्टिव्हिटी पर्याय-वाय-फाय, ब्ल्यूटूथ, यूएसबी टिथरिंग व जीपीआरएस अशी सुविधा प्रदान करतो. तसेच यामधील उल्लेखनीय बाब म्हणजे त्याची ३डी ग्रॅव्हिटी आणि प्रॉक्झिमिटी सेन्सर्स, जे दीर्घकालीन बॅटरी लाइफला सर्मथित करतात. ग्राहकाच्या अनुभवाला वर्धित करण्यासाठी अँडकॉम ए३५ चे काळय़ा, पिवळय़ा, सफेद व लाल रंगाचे बॅक पॅनेल्स आणि ३९९ रुपये किंमतीचे स्क्रीन गार्ड पूर्णत: मोफत उपलब्ध आहेत. बजेट स्मार्टफोन दोन आठवड्यांसाठी केवळ होमशॉप १८ वर आणि त्यानंतर प्रमुख रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाईन पोर्टल्सवर उपलब्ध असणार आहे.