गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 13 जून 2015 (14:26 IST)

अँपलने लाँच केली नवी ISO 9 ऑपरेटिंग सिस्टिम

जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी ‘अँपल’ने सॅन फ्रॉन्सिसकोमध्ये आपल्या नव्या खजड9 व्हर्जनची घोषणा केली. तसेच अँपलने एक नवं म्युझिक अँप आणि इतरही नवीन अँपल वॉच अँपही लाँच केले आहेत.
 
सॅन ङ्ख्रॅन्सिसकोमधील डेव्हलपर्स परिषदेत सर्वाधिक चर्चा झाली ती अँपलच्या नव्या ऑपरेटिंग सिस्टिम ISO 9ची. अँपलची ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम ही आयङ्खोन ङ्खोर एस आणि यानंतर आलेल्या सर्व मोबाइल फोनमध्ये असणार आहे. तसेच आयपॅड 2 आणि त्यानंतर आलेल्या आयपॅडमध्ये, फिफ्थ जनरेशन आयपॅडसह आयपॅड मिनी मॉडेलमध्ये उपलब्ध असणार आहे. अँपलचे नव्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये नव्या सर्च फिचरच्या मदतीने आपण रिलेवेंट कॉन्टॅक्ट, सजेस्टेड अँप, जवळील महत्त्वाची स्थानं यासाठी तुम्हाला  ISO9 मध्ये होम स्क्रिनवर सर्च ऑप्शन देण्यात आला आहे. सुरक्षेच्या बाबतीत खडज 9ने इतर सर्व ऑपरेटिंग सिस्टिमला मागे टाकलं आहे. जर तुम्ही बिझनेस वापरासाठी वापर करीत असल्यास आयओएस हा शानदार अनुभव आहे. आयओएस 9 अपडेटनंतर समरफॅक्टमध्ये असणार्‍या डेटाबाबत निश्चिचत होऊ शकता. आयएसओ 9 अपडेटमुळे तुम्ही आयपॅडवर दोन अँप्लिकेशन एकाच वेळी चालवू शकता. याला ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने वापरू शकता. हे फिचर केवळ आयपॅड एअर 2, एअर मिनी 3 आणि मिनी 2 वर वापरु शकता. ISO 9 मध्ये अँपल मॅपचे ङ्खिचर पूर्वीपेक्षा दर्जेदार आहे. कंपनीचा दावा आहे की, गुगल मॅपपेक्षा 3.5 पट उत्तम असेल. या मॅपमुळे आपल्याला सिनेमागृह, हॉटेल सहज शोधता येतील.