शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 14 जुलै 2014 (14:20 IST)

अमर चित्र कथा' आता अँपवर

गुरूची आज्ञा प्रमाण मानणारा नंदी किंवा शूरवीर जटायूची गोष्ट कोणाला आवडणार नाही? सर्वच वयोगटातील वाचकांना गेल्या पाच दशकांपासून भुरळ घालणार्‍या 'अमर चित्र कथा' आता नवीन अँपच्या रूपात वाचकांच्या भेटीला आले आहे. 'एसीके कॉमिक्स' या नावाने हे अँप मोबाईल, टॅबवर डाऊनलोड करता येणार आहे. देशातील वाचकांच्या सर्वाधिक आवडीचा कॉमिक ब्रँड अमर चित्र कथा हा आपल्या अस्सल व अतुलनीय कथाकथनासाठी नावाजला जातो.

१९६७ सालापासून अमर चित्र कथाने मुलांना आवडेल अशा पद्धतीने अनेक रोचक गोष्टी सादर केल्या आहेत. आता हे कॉमिक अँपच्या रूपाने देखील सादर करण्यात आले आहे. त्यामुळे सहजतेने मोबाईल, टॅबवर कॉमिक डाऊनलोड करून वाचता येऊ शकणार आहे. अमर चित्र कथाने लॅण्डमार्क बूक स्टोअरमध्ये स्माईल फाऊंडेशनच्या मुलांसोबत नुकतेच 'डिव्हाईन बीइंग्ज' या नवीन पुस्तकाचेदेखील अँप आणले होते. डिव्हाईन बीइंग्जमध्ये पाच विभागात ख्यातनाम पौराणिक पात्रांच्या रोमांचक गोष्टी सादर केल्या गेल्या आहेत. प्रत्येक विभाग एकेका पात्रासाठी दिला गेला आहे.