बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. मोबाईल
Written By वेबदुनिया|

आता आइडियाचेही 'नेट सेटर'

WD
रिलायन्स, टाटा नंतर आता आइडिया सेल्युलरनेही यूएसबी कार्ड 'नेट सेटर' लॉंच केले आहे. यामध्ये एजची सुविधासुध्दा उपलब्ध आहे.

हे कार्ड सध्या मुंबईतील प्री-पेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. हे 'नेटसेटर' कार्ड प्लग एंड प्ले सुविधाबरोबरच वायरलेस इंटरनेट सेवाही देते. विण्डोंज 2000, एक्सपी, विस्ता आणि मॅकवर हे काम करू शकते.

आइडियाच्या या नेटसेटर कार्डवरून प्रती 10 केबीसाठी 1 पैसा या दराने ग्राहकांना इंटरनेट सेवा मिळणार आहे. ही सेवा एसएमएसवरूनही सब्स्क्राइब करता येते. प्रतीदिन30 रुपये या दराने अनलिमिटेड प्लॅन देण्यात आला आहे. पोस्टपेड ग्राहकांसाठी ही सुविधा 2 हजार 490 रुपये या दरात उपलब्ध आहे.