गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Updated : मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (14:17 IST)

आता पाहा मोबाइलवर टीव्ही

आपल्या ‘फुल्ली लोडेड’ मोबाइलमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असण्यावर प्रत्येक मोबाइलधारकाचा भर असतो.  बाब लक्षात घेऊन दूरदर्शनने पुढल वर्षापासून थेट मोबाइलवर 20 फ्री (टीव्ही) चॅनलचे प्रसारण करण्याची योजना आखली आहे. यासाठी खासगी मिडिया हाउसच्या एअर चॅनल्सबरोबर भागीदारीही केली आहे. विशेष म्हणजे ही योजना सर्वप्रथम आर्थिक राजधानी मुंबई आणि राजधानी दिल्लीमध्ये सुरू होणार आहे.

आपल्या ‘इडिट बॉक्स’च्या वेडाची गरज भागविण्यासाठी सध्या सर्वत्र डिश, केबल आणि अँन्टिना हे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु आता यामध्ये आणखी एका पर्यायाची भर पडली आहे. आपल्या मोबाइल फोनवर 20 फ्री (टीव्ही) चॅनल्स प्रसारित करण्याची दूरदर्शनची योजना असल्याची माहिती ‘प्रसार भारती’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी दिली. ही सेवा मोबाइल फोनवरून पुरवण्याचा आरंभ मुंबई आणि दिल्लीपासून होणार आहे.

‘एअर चॅनल्स’ पुरण्यासाठी डिव्हिबी-टीच्या (डिजिटल व्हिडिओ ब्रॉडकास्ट-टेरिस्ट्रअल) डोंगलचा वापर करण्यात येणार आहे. ‘सर्व फ्री चॅनल्स मोफत पुरविण्याचे उद्दिष्ट असून यासाठी डीटीएचचा आधार घेण्यात येईल. या योजनेत भागीदारी करण्यासाठी आम्ही खासगी कंपन्यांकडे विचारणा करत आहोत. ही योजना राबवण्यासाठी दूरसंपर्क कंपन्या इच्छुक आहेत, असेही सरकार म्हणाले. या सेवेसाठी इंटरनेट सेवेची गरज भासणार नाही. टीव्ही टॉवरद्वारे या सेवेचे प्रक्षेपण कले जाणार आहे.

आपल्याला सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे दिवसातील दहा ते बारा तास टीव्हीपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे बरीच मंडळी या वेळात टॅब्लेट किंवा मोबाइलचा वापर करतात. पुष्कळ लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. ते अनेक चॅनल्स मोबाइलवर पाहू शकतील तसेच त्यांना यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत. ही सेवा पुरवण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून महसूल गोळा केला जाईल असेही सरकार यांनी स्पष्ट केले.