शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Updated : गुरूवार, 2 एप्रिल 2015 (14:18 IST)

आता, व्हॉट्स अँप हिस्ट्री ‘गुगल ड्राइव्ह’वर

लवकरच व्हॉट्स अँप आपल्या यूजर्सना एक खुशखबर देणार असं दिसतंय. जे यूजर्स वारंवार आपला फोन बदलतात आणि त्यामुळे त्यांची चॅट हिस्ट्री पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, अशा यूजर्ससाठी व्हॉट्स अँप नवीन फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

यूजर्सची हीच समस्या दूर करण्यासाठी व्हॉट्स अँप चॅट हिस्ट्रीला गुगल ड्राइव्हवर स्टोअर करता येऊ शकेल, यासाठी व्हॉट्स अँपचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे तुम्ही कोणत्याही अँन्ड्रॉइड फोनवर तुमची चॅट हिस्ट्री अगदी सहज मिळवू शकाल. गुगल ड्राइव्हवर तुम्ही तुमची मीडिया हिस्ट्रीसुद्धा स्टोअर करू शकता. मात्र, येथे तुम्ही व्हिडिओ स्टोअर करू शकत नाही. तसेच या फीचरला वाय-फायद्वारे यूजर्स वापरू शकणार नाहीत.

या नवीन फीचरमुळे तुम्ही नवीन डिव्हाईसवर लॉग इन केल्यावर तुमची चॅट हिस्ट्री सेव्ह करण्यासाठी मेसेज येईल. व्हॉट्स अँपकडून हे फीचर्स कधी लॉन्च करणार याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. अँन्ड्रॉइड यूजर्स चॅट हिस्ट्री स्टोअर करण्यासाठी Menu Setting Chat Setting मध्ये जाऊन हिस्ट्री सेव्ह करू शकता.

या प्रक्रियेत तुम्ही तुमच्या फोनमधील मायक्रो एसडी कार्डमध्येही चॅट हिस्ट्री सेव्ह करू शकता.