शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जून 2014 (17:22 IST)

आयडियाने 5 हजारापेक्षा कमी किमतीत सादर केला 3जी स्मार्ट फोन

आयडिया सेल्यूलरने आपल्या 3जी स्मार्टफोन पोर्टफोलियोचा विस्तार करत एक अन्य उपकरण सादर केले आहे. याची किंमत 4,999 रुपये आहे. हा  हँडसेट डेटा लाभासोबत मिळेल. 

देशातील सर्वात मोठी मोबाइल ऑपरेटरने आपल्या मागील 3जी स्मार्टफोन शृंखलेतून आधीच 7 लाख उपकरणांची विक्री केली आहे. आयडिया सेल्युलरने सांगितले आहे की आम्ही एकमात्र मोबाइल आपरेटर आहे जे 3जी उपकरणांची शृंखला सादर करत आहोत.  

आमचे लक्ष्य 2जी पासून 3जीकडे जाणारे ग्राहक आहेत. या नवीन उपकरणाच्या सादरीकरणाबरोबरच आयडियाच्या 3जी स्मार्टफोनचा पोर्टफोलियो 16वर पोहोचला आहे. हे उपकरण 11 सर्किलोत उपलब्ध राहणार आहे.