गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 24 सप्टेंबर 2014 (16:46 IST)

आयफोन- 6 खिशात ठेवला की वाकतो?

अॅपलचा बहुचर्चित आयफोन खिशात ठेवला की वाकत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावरून आयफोन- 6 आणि आयफोन- 6 प्लस स्मार्टफोनमध्ये एक मोठी तांत्रिक चूक असल्याचे समोर आले आहे. अनेक युजर्सनी याबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत. 
 
आयफोन 6आणि आयफोन 6प्लस अमेरिकेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात ते 17 ऑक्टोबरला दाखल होणार आहेत. फोन खिशात ठेवल्यानंतर त्यावर थोडाजरी दबाव पडला तर, अ‍ॅल्युमिनीयम बॉडी असलेले हे फोन वाकतात, असे बहुतांश युजर्सनी म्हटले आहे.  
 
दरम्यान, आयफोन- 6 लॉन्च झाल्यानंतर जगभरामध्ये या फोनची क्रेझ वाढली आहे. अ‍ॅपलने आतापर्यंत या फोनच्या एक कोटी युनिटची विक्री केली आहे.
 
वाकलेल्या आयफोन 6 स्मार्टफोनची अनेक छायाचित्रे ऑनलाइन पोस्ट करण्यात आली आहेत. अनेक युजर्सनी वेबसाइट मॅक रुमर्स डॉट कॉमच्या फोरमवर त्याची तक्रार केली आहे. फोनचा वरचा भाग - व्हॅल्यूम कंट्रोल बटनाजवळ दबाव पडला तर तिथे हा फोन वाकत आहे.