शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2015 (15:14 IST)

आयफोन यूजर्ससाठीही व्हॉट्स अँपचे व्हॉईस कॉलिंग फीचर

व्हॉट्स अँपने अँड्रॉईडनंतर आता आयफोनसाठीही व्हॉईस कॉलिंग फीचर अपडेट करणं सुरू केले आहे. एका महिन्यापूर्वीच व्हॉट्स अँपने अँड्रॉईड यूजर्ससाठी हे फीचर उपलब्ध करून दिले आहे आणि आतापर्यंत बहुतांश अँड्रॉईड यूजर्सपर्यंत हे फीचर पोहोचले आहे. अँड्रॉईडनंतर व्हॉट्स अँपने आयफोनसाठीही कॉलिंग फीचर रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे. आयफोन यूजर्स अँप स्टोअरमधून व्हॉट्स अँपचा लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करू शकतात. या नव्या अपडेटमध्ये आयफोन यूजर्स व्हॉट्स अँप आणि इतर अँप्समध्ये फोटो, व्हिडिओ, लिंकही पाठवू शकतात. यूजर्सच चॅटिंगदरम्यान फोटो क्लिक करण्यासोबतच एकाचवेळी अनेक व्हिडिओही पाठवणे शक्य होणार आहे.

मात्र, जरी तुम्ही आयफोन यूजर्स असाल, तरीही तुम्हाला या फीचर्सचा लाभ घेण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण अँड्रॉईड यूजर्ससारखाच सर्व आयफोन यूजर्सपर्यंत हे फीचर पोहोचण्यास काळ लागण्याची शक्यता आहे.