मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2015 (15:29 IST)

आयफोन सेव्हन सप्टेंबरमध्ये

आयफोन सिक्स व प्लसच्या तडाखेबंद विक्रीनंतर अँपल त्यांच्या नव्या स्मार्टफोन लाँचिंगच्या तयारीत असल्याचे वृत्त असून हा नवा फोन आतापर्यंतच्या कंपनीच्या सर्व फोनमध्ये जादा पॉवरफुल असेल आणि आयफोन सेव्हन या नावानेच तो बाजारात येईल असे सांगितले जात आहे. अँपलच्या दरवर्षी सप्टेंबरमध्ये होत असलेल्या इव्हेंटमध्ये आयफोन सेव्हन आणि प्लस सादर केले जातील असा अंदाज वर्तविला जात आहे.
 
आयफोन सेव्हन संदर्भातल्या अफवा आतापासूनच वेगाने पसरत आहेत. त्याची फिचर्स आणि फोटोही इंटरनेटवर लीक झाले आहेत. जाणकारांच्या मते आयफोन सेव्हन अधिक मोठय़ा स्क्रीनचा असेल आणि फिचर्सही अधिक चांगले असतील. या फोनसाठी 5.5 इंचाचा सफायर ग्लास डिस्प्ले हायर रेझोल्युशनसह दिला जाईल. याचा वापर प्रथम आयफोन वॉचमध्ये केला गेला आहे. कर्व्ह बॉडीचा हा फोन डीएसएलआर कॅमेर्‍यासह येईल. यासाठी कंपनीने एका कंपनीशी 127 कोटींचे डील केले असल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे पोस्ट शूट रिफोकसिंग आणि थ्रीडी मॉडेलिंग सुविधा मिळू शकणार आहे.
 
या फोनसाठी सॅमसंग ए 9 चिपसेट बनवित असल्याचेही समजते. फोनला यूएसबी-सी कनेक्टीव्हीटी, आयओएस 9ओएस असेल आणि हा फोन 32, 64 व 128 जीबी मेमरीसह येईल असेही अंदाज वर्तविले जात आहेत. त्यांच्या किमती अनुक्रमे 56 हजार, 61 हजार व 66 हजार रूपये असतील.