गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Updated : मंगळवार, 12 जानेवारी 2016 (15:48 IST)

इंटेक्सने लाँच केला स्वस्तातला स्मार्टफोन

नवीन इंटेक्स क्लाउड चॅम्प हा स्मार्टफोन मोबाइल उत्पादक कंपनी इंटेक्सने लाँच केला असून हा मोबाइल फक्त कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 3,999 रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
 
कसा आहे क्लाउड चॅम्प. यात 4.5 इंचाचा एफडब्ल्यूवीजीए 480*854 रेझोल्यूशनचा डिस्प्ले देण्यात आला असून डुअर-कोर, एमटी 6572 एक्स प्रोसेसर देण्यात आला आहे. याची स्टोअरेज क्षमता 4 जीबी आणि ती 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. त्याचबरोबर यात 3 जी, वाई-फाई, ब्लूटूथ, जीपीएस अशा कनेक्टीव्हिटी देण्यात आल्या आहेत. याच्या बॅटरीची क्षमता 1700 एमएएच एवढी आहे. या मोबाइलसोबत आपल्याला हेडफोन, डेटाकॉड, ट्रवल चार्जर, स्क्रीनगार्ड, प्रोटेक्ट कव्हरदेखील मिळेल असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे.