गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2016 (12:00 IST)

एका झटक्यात शाओमीच्या ‘रेडमी नोट 3’ची विक्री!

शाओमीचा नवा स्मार्टफोन रेडमी नोट 3चा काल पहिला फ्लॅश सेल होता. हा फोन अँमेझॉन आणि mi. लेावर विक्रीसाठी उपलब्ध होता. रेडमी नोट 3 या दोन्ही वेबसाइटवर आऊट ऑफ स्टॉक झाला. या फोनचा दुसरा सेल 16 मार्चला होणार आहे. शाओमीनं ट्विट करुन या फोनच्या पुढील सेलची माहिती दिली आहे. ज्याची बुकिंग संध्याकाळी 6 वाजेपासून सुरु झाली आहे. मात्र, किती वेळात हे स्मार्टफोन सोल्ड आऊट झाले याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही. रेडमी नोट 3च्या बर्‍याच चाहत्यांची मात्र पहिल्याच सेलमध्ये बरीच निराशा झाली. कारण की हा स्मार्टफोन काही सेकंदांमध्येच सोल्ड आऊट झाला होता. तर ट्विटरवर, अनेकांनी शाओमीवर जोरदार टीका केली. असले फ्लॅश सेल म्हणजे खोटे आणि पब्लिसिटी स्टंट असल्याचीही टीका करण्यात आली आहे. 
 
‘रेडमी नोट 3’चे फीचर्स
डिस्प्ले : 5.5 इंच रेझुलेशन :1080x1920 
भारतातील पहिला स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर 5 मेगापिक्सल फ्रंट, 
16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, झूम केल्यानंतरही फोटो फाटणार नाही कॅमेर्‍यामध्ये ऑटोफोकस सेल्फी फोटोची क्वालिटी उत्तम असल्याचा दावा फिंगरपिंट्र सेंसर मेटल बॉडीमुळे पाठीमागील बाजू दणकट बॅटरी 4050mh : कंपनीचा दावा नेक्सस 6 पी, गॅलेक्सी नोट 5 आणि एचटीसी या फोनपेक्षाही जास्त बॅकअप देत असल्याचा दावा.