बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 13 नोव्हेंबर 2014 (06:35 IST)

एलजीचा अँण्ड्रॉईड किटकॅट स्मार्टफोन 'एल ४५'

एलजी कंपनीच्या उत्पादनांना बाजारात जास्त मागणी असते, मग ते एलसीडी असो वा स्मार्टफोन, फ्रीज आदी. स्मार्टफोन बाजारपेठेतदेखील एलजीने आपला ठसा उमटला असून ग्राहकदेखील एलजीच्या स्मार्टफोनना पसंती देताना दिसत आहेत. अशा ग्राहकांच्या मागणीमुळे एलजीने एलजी 'एल ४५' हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. स्मार्टफोनची स्क्रीन ३.५ इंच इतकी असून त्यामध्ये आधुनिक अँण्ड्रॉईड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. अवघ्या ६५00 रुपये किंमत असलेल्या स्मार्टफोनची रेजोल्यूशन ४८0 गुणे ३२0 पिक्सल एचव्हीजीए इतकी आहे. १0९.00 मिमी लांब असणारा हा हॅण्डसेट ५९.९ मिमी आडवी साईज आहे. तसेच १२.0 मिमी मोठा आहे. यामध्ये ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर फ्रंट व्हीजीए कॅमेरासुद्धा आहे. 'एलजी एल ४५' डुअल सीम सोबत ३जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. 
 
यामध्ये आधुनिक ऑपरेटिंग सिस्टम अँण्ड्रॉईड किटकॅट असले तरी १ जीएचजेड डुअल कोर प्रोसेसर दिले आहे. परिणामी यामध्ये हाइ-एंडचे गेम्स चालणार नाहीत. हीच उणीव केवळ या स्मार्टफोन आहे. त्याच्याव्यतिरिक्त ब्लूटूथ ४.0, वाइफाइ, ए-जीपीएस आणि माइक्रो यूएसबी पोर्ट आहे. हॅण्डसेटमध्ये ४ जीबीचे इंटरनल स्टोरेज आहे. जो माइक्रो एसडी कार्डसोबत ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यामध्ये १५४0 एमएएचची बॅटरी दिल्याने दीर्घकाळ बोलण्यासह व्हिडीओ पाहणे, गाणी ऐकण्याचा आनंद लुटता येणार आहे.