शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By wd|
Last Modified: मुंबई , बुधवार, 24 सप्टेंबर 2014 (10:32 IST)

खुशखबर, आयफोन-5एस झाला स्वस्त

आपल्या हातातही आयफोन असावा, अशी इच्छा असणार्‍यांसाठी खुशखबर आहे. अॅपलचा बहुचर्चित फोन 'आयफोन 5एस'चा स्वस्त झाला आहे. ई-कॉमर्स साइटवर आता हा फोन आपल्याला अवघ्या 35 हजारांत उपलब्ध झाला आहे. आयफोन 6 लॉन्च झाल्यामुळे आयफोन 5एसची किमत कमी करण्‍यात आल्याचे सूत्रांन‍ी सांगितले जात आहे.  

'फ्लिपकार्ट' आणि 'अॅमॅझॉन'वर आयफोन-5एस गोल्डच्या 16जीबी फोनची किंमत 34,850 रुपये आहे. ब्लॅक आणि सिल्व्हर कलरमध्ये असलेल्या फोनची किमत जवळपास 37 हजार रुपये आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी लॉन्च झालेल्या आयफोन गोल्डची डिमांड सर्वात जास्त होती आणि विक्री सुरू होताच हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता.

यापूर्वील आयफोन 5एस या 16 जीबी फोनची किमत 53,500 रुपये होती. तर 32 आणि 64 जीबी फोनची किंमत अनुक्रमे 62,500 आणि 71,500 रुपये होती.