शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 13 ऑक्टोबर 2014 (15:06 IST)

गुगलचा नेक्सस नाईन १५ आकटोबरला लाँच होणार

गुगलच्या अनेक चर्चित गॅजेटमध्ये गणना होत असलेला नेक्सस नाइन टॅब्लेट येत्या १५ आक्टोबरला लाँच होत असल्याची पक्की खबर आहे. बाजारात हा टॅब्लेट ३ नोव्हेंबरपासून उपलब्ध होऊ शकेल असेही समजते. याची किमत अंदाजे २५ हजार आहे.
 
नेक्ससची पहिली मॉडेल्स खूप हाय स्पेशिफिकेशनची नव्हती. ही त्रुटी नवीन टॅब्लेटमध्ये भरून काढण्यात आली आहे. लिक झालेल्या फोटोवरून हा टॅब्लेट ८.९ इंची स्क्रीन, १६ व ३२ जीबी इंटरनल मेमरी, ८ एमपीचा कॅमेरा व ३ एमपीचा फ्रंट कॅमेरा सह असून त्याच्यावर एचटीसीचा लोगो आहे. एचडी गेम शौकिनांसाठी हा टॅब्लेट समाधान देणारा आहेच पण हेवी अॅप्सचा सहज वापरही त्यावर करता येणार आहे.
 
हा टॅब्लेट १६ आक्टोबरला येत असलेल्या आयपॅड मिनी ३ शी चांगली टक्कर देईल असा जाणकरांचा होरा आहे. १६ जीबीसाठी २५ हजार तर ३२ जीबीसाठी ३० हजार अशी त्याची किंमत असेल असे सांगितले जात आहे. अॅपल आयपॅड मिनीपेक्षा याचा आकार मोठा आहे.