मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

गॅलेक्सी एस7 आणि एस7 एज लाँच, जाणून घ्या ‍फीचर्स

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने भारतीय बाजारात आपला फ्लॅगशिप डिव्हाइस गॅलेक्सी एस7 व गॅलेक्सी एस7 एज सादर केला. याची किंमत 48900 रुपये व 56900 रुपये आहे.
 
कंपनीप्रमाणे हे दोन्ही फोन वाटरप्रुफ आहे आणि अर्धातासापर्यंत पाण्यात बुडलेले राहू शकतात. एंड्रॉयड 6.0 समर्थत या स्मार्टफोन्समध्ये चार जीबी रॅम, ओक्टा कोर प्रोसेसेर, 12 मेगापिक्सल रिअर कॅमरा व पाच मेगापिक्सल फ्रंट कॅमरा आहे.
 
5.1 इंच डिस्प्ले असलेल्या गॅलेक्सी एस7 मध्ये 3000एमएएच बॅटरी तर 5.5 इंच डिस्प्ले असलेल्या गैलेक्सी एस7 एज मध्ये 3600 एमएएच बॅटरी आहे. यात वायरलेस आणि क्विक चार्ज सुविधाही देण्यात आली आहे.
 
या व्यतिरिक्त दोन्ही स्मार्टफोन्समध्ये एनएफसी, एमएसटी सारखे फीचर आणि एक्सीलरोमीटर, प्रॉक्सीमिटी, आरजीबी लाइट, जियो-मैग्नेटिक जायरो, फिंगरप्रिंट, बॅरोमीटर, हॉल व एचआरएम सारखे सेन्सॉरही प्रदान करण्यात आले आहे.
 
ब्लॅक ओनिक्स, गोल्ड प्लॅटिनम आणि सिल्वर टायटॅनियम रंगात उपलब्ध या दोन्ही स्मार्टफोन्सची बुकिंग 8 मार्च ते 17 मार्च पर्यंत केली जाऊ शकते. 18 मार्च पासून हे ग्राहकांना उपलब्ध होतील.