शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2015 (15:15 IST)

जपा मोबाइलची बॅटरी

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या घटनांबद्दल ऐकलं असेल. बॅटरीचा स्फोट जीवघेणा ठरण्याची शक्यता असते. स्मार्टफोनची बॅटरी कधी दगा देईल, याचाही नेम नसतो. तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होऊ नये, यासाठी काळजी घ्यायला हवी.



* रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवू नका. मोबाईल बेडपासून लांबच ठेवा.

* मोबाईल चार्जिगला लावला असताना कोणत्याही परिस्थितीत फोनवर बोलू नका.

* स्मार्टफोनची बॅटरी कधीही पूर्ण चार्ज करू नका. बॅटरी 10 टक्के तरी कमी चार्ज करा.

* अनेकांना रात्री फोन चार्जिगला लावून झोपण्याची सवय असते. फोन जास्त चार्ज झाल्यास बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता असते. रात्री झोपताना मोबाईल चार्जिगला लावू नका.

* स्मार्टफोन ज्या कंपनीचा आहे त्याच कंपनीचा चार्जर वापरा. स्वस्तातला चार्जर वापरू नका.

* मोबाइलमध्ये दुसरी बॅटरी टाकू नका. बॅटरी खराब झाल्यास ज्या कंपनीचा मोबाईल त्याचीच बॅटरी वापरा.

* ओव्हरहिटींगमुळे बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता असल्याने पृष्ठभागावर मोबाईल चार्जिगला लावू नका.