बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: मंगळवार, 18 नोव्हेंबर 2014 (15:58 IST)

तरुणाईला वेड ओएसचे

आपण नेहमी कॉलेज किंवा ट्रेनमध्ये, बाजारात किंवा इतर ठिकाणी पाहात असतो की, तरुणाई तासन्तास मोबाईल फोनवर व्यस्त असते. आजकाल तरुण वर्ग जास्तीत जास्त वेगवेगळय़ा फ्री अँप्सचा वापर करताना दिसत आहे. ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. ही सिस्टम प्रत्येक स्मार्टफोनची वेगळी असते. तरुण वर्ग आपल्या आवडीनुसार ओएसची निवड करत असतो. उदा. अँड्रॉईड फोन हे ओपन सोर्स असल्याने सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची अँप्लिकेशन अँड्रॉईडच्या प्ले-स्टोअरवर उपलब्ध असतात. या प्ले-स्टोअरपेक्षा विंडोज व आयओएसवर अँप्स कमी प्रमाणात उपलब्ध असतात. अनेक अँप्स हे मोफत उपलब्ध असतात. त्यामुळे तरुणाई जास्तीत जास्त आपल्या स्मार्टफोनमध्ये मोफत अँप्सचा वापर करत असते. 
 
स्मार्टफोनमध्ये असेही काही अँप्स असतात; ज्या अँप्सचा ऑफिस कामांसाठी आणि दैनंदिन वापरासाठी उपयोग होईल, मात्र हे अँप्स विकत घ्यावे लागतात. त्यामुळे तरुणाईचे या अँप्सकडे दुर्लक्ष होत असते. ऑपरेटिंग सिस्टिम (ओएस)चा जास्तीत जास्त वापर हा आयटी सेक्शनमध्ये काम करणार्‍या वर्गाला होत असतो. काही अँप्समार्फत आपल्याला हॅकर्सपासून सुरक्षा मिळत असते त्यामुळे आपण विंडोजमधून ऑनलाईन व्यवहार बिनधास्तपणे करू शकतो. आपल्या फोनची बॅटरी लो होणे, चार्जर लावण्यासाठी जागा नसते मग आपला सर्वांशी संपर्क तुटतो. अशा वेळी बॅटरी बॅकअप असणारा आयफोन किंवा हाय रिझॉल्युशनचा फ्रंट कॅ मेर्‍याचा आपल्या मीटिंगमध्ये किंवा कॉन्फरन्स कॉलिंगमध्ये खूप उपयोग होत असतो. अशा प्रकारच्या अनेक सुविधा ओएसमध्ये आहेत. ओएसमध्ये आता विविध प्रकार आढळून येतात. त्यामुळे ज्या तरुणांना आपण मोबाईल फोनवर सतत व्यस्त असताना पाहतो, ते नक्कीच अशा सुविधांच्या शोधात असतात. आजच्या तरुणाईला नवीन ऑपरेटिंग सिस्टिम (ओएस)चा कसा वापर होतो याचा शोध लावण्यात खूप उत्सुकता दिसून येत आहे.