शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 4 ऑक्टोबर 2014 (11:36 IST)

दोन स्क्रीनचा योटाफोन भारतात लवकरच

रशियन कंपनी योटा डिव्हायसेसचा दोन स्क्रीन म्हणजे डय़ुअल स्क्रीनचा स्मार्टफोन भारतीय बाजारात लवकरच दाखल होत असल्याचे संकेत दिले गेले आहेत. या कंपनीने त्यांचा हा अनोखा स्मार्टफोन योटाफोन विक्रीसाठी फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीच्या लिस्टमध्ये समाविष्ट केला आहे. फ्लिपकार्ट ही भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन खरेदी विक्री कंपनी असून गुगलनेही त्यांचे मोटो जी, मोटो एक्स फोन याच कंपनीमार्फत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते. योटा डिव्हायसेसने त्यांच्या योटाफोनची किंमत अथवा लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही. 
 
हा फोन गतवर्षी टेक शो कंझ्युमर्स इलेक्ट्रॉनिक शोमध्ये म्हणजे डिसेंबर 2013 मध्ये सादर केला आहे आणि त्याची विक्रीही केली जात आहे. या फोनसाठी 4.7 इंचाचा ई रिडर स्क्रीन आणि नॉर्मल 5 इंची स्क्रीन असे दोन स्क्रीन आहेत. या प्रकारचा हा पहिलाच स्मार्टफोन असल्याचेही सांगितले जात आहे.