शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आयटी
  4. »
  5. मोबाईल
Written By वेबदुनिया|

नोकियाचा आशा 501 वर वॉट्सअँप

WD
सोशल नेटवर्किगमध्ये वेगाने लोकप्रिय होणारी वॉट्सअँप ही इन्स्टंट मेसेंजिंग सेवा आता नोकियाच्या आशा 501 वर उपलब्ध करण्यात आली असून यात प्रथमच नोकिया आशा या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे.

हा मोबाइलचा वापर करणारे हे अँप्लिकेशन सॉफ्टवेअर अपडेटसह डाऊनलोड करू शकणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मे मध्ये आशा 501 हा मोबाइल दाखल झाला होता. वॉट्सअँपसह आशा प्लॅटफॉर्मवर चालणारा हा पहिला मोबाइल असल्याचे नोकिया इंडियाचे विपणन संचालक विरल ओझा यांनी सांगितले.

यामध्ये सिंगल स्वाइप कॅमेरा, फेसबुकवर सिंगल टच शेअर आणि त्यावरील कमेंट आणि लाइक स्क्रीनवर पाहता येणारा हा मोबाइल असल्याचे त्यांनी सांगितले. वॉट्सअँपसह अपडेटेड सॉफ्टवेअर असलेला नवा नोकिया आशा 501 हा मोबाइल 5 डिसेंबर 2013 ला स्टोअरमध्ये उपलब्ध होईल, तर सध्या वापरात असलेल मोबाइलवर हे सॉफ्टवेअर इंटरनेटवरून अपडेट करता येणार असल्याचे नोकियाने म्हटले आहे.