गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2016 (11:28 IST)

पुरुषांपेक्षा महिलांना स्मार्ट फोनचे जास्त‘वेड’

पुरुषांपेक्षा महिलांनाच स्मार्ट फोनचे वेड अधिक असते. पुरुषांपेक्षा जास्त वेळ त्या मोबाइलमध्ये डोके खुपसून बसतात, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून दिसून आले आहे. दिवसातील चार तास किंवा त्याहून अधिक काळ महिला स्मार्ट फोनचा वापर करतात, असे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
 
दक्षिण कोरियातील अजोउ विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे. विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी अंदाजे दीड हजार मोबाइल यूझरचे सर्वेक्षण करून याबाबत निष्कर्ष मांडले आहेत. एकूण यूझरपैकी 52 टक्के महिला दिवसाला चार तासांपेक्षा जास्त काळ स्मार्ट फोन वापरतात. तर, 29.4 टक्के पुरुष चार तासांपेक्षा जास्त वेळ स्मार्ट फोन वापरतात. अंदाजे 23 टक्के   महिला दिवसाला सहा तासांपेक्षा जास्त फोन वापरतात. पुरुषांमध्ये हेच प्रमाण केवळ 11 टक्केच आहे. अंदाजे 37 टक्के महिला दुसर्‍याशी बोलताना, गप्पागोष्टी करीत असताना मोबाइल वापरतात. दर पाच महिलांपैकी एक महिला (अंदाजे 20.1 टक्के) स्मार्ट फोन वापरत असताना अस्वस्थ होते. तर पुरुषांची टक्केवारी 8.9 टक्के आहे. पुरुष काही कामाच्या निमित्ताने स्मार्ट फोनचा वापर करतात. सोशल नेटवर्किग वेबसाइटचा वापर केला जातो. मात्र, अशा पुरुषांचे प्रमाण 12 टक्क्यांपेक्षा जास्त नाही.