शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मार्च 2015 (12:32 IST)

फक्त 6,999 रुपयांत Motorolaने सादर केला 3जी इनेबल Moto E

हँडसेट निर्माता कंपनी मोटोरोलाने मंगळवारी 3 जी (थर्ड जनेरेशन) नवीन मोटो ई लाँच केला आहे. या फोनची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. नवीन 3जी इनेबल माटो ई मंगळवारी 11मार्च पासून फ्लिपकार्टवर मिळण्यास सुरू झाले आहे.  
 
मोटोरोला इंडियाचे जनरल मॅनेजर अमित बोनी यांनी दिल्लीत सांगितले की कंपनी लवकरच 4जी एलटीइचा स्मार्टफोन मोटो ई भारतात  सादर करणार आहे.  
  
या स्मार्टफोनला खास करून त्या लोकांसाठी तयार करण्यात आला आहे ज्या लोकांनी नुकतेच आपले फीचर फोन सोडून स्मार्टफोनचा वापर सुरू केला आहे.  
 
स्मार्टफोनच्या खास फीचर्समध्ये 1.2गीगाहर्ट्ज क्‍वाडकोर सीपीयू देण्यात आले आहे. 4.5 इंचीचा डिस्प्ले दिला आहे, 2390 एमएएचची बॅटरी, 5 मेगापिक्सल बँक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.