मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 13 नोव्हेंबर 2014 (06:48 IST)

फुलपाखरू अँप्सच्या रूपात

जेव्हापासून स्मार्टफोन आले आहेत तेव्हापासून आपल्याला विविध गोष्टी फोनवरच पाहावयास मिळतात. आता प्राणिमात्रांवर प्रेम करणार्‍या लोकांना त्यांचे आवडते फुलपाखरू या स्मार्टफोनवर पाहायला उपलब्ध होऊ शकते. आता बाजारात आय लव्ह बटरफ्लाय या नवीन अँप्सचे लाँचिंग झाले आहे. हा अँप्स डाऊनलोड केल्यावर त्याचा वापर कशा प्रकारे करावा त्या संदर्भातील माहितीही या अँपमध्ये उपलब्ध आहे. या अँपवर तुम्हाला फुलपाखरांच्या विविध जाती पाहायला मिळतील व घरबसल्या आपल्या लहान मुलांना खूश करता येऊ शकते. या अँपमध्ये फुलपाखरांची जाती, त्यांचा रंग असा का आहे त्या संदर्भातील माहिती व त्यामागचे कारण अशा सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होईल. एखाद्या फुलासंदर्भात संशोधन करणार्‍या लोकांना या अँपचा भरपूर उपयोग होऊ शकतो, कारण या अँपमध्ये फुलांच्या १५३ जातींबद्दल माहिती देण्यात आली आहे. ज्या निसर्गप्रेमींना निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडते अशा निसर्गप्रेमींना या अँपद्वारे निसर्गाचा आनंदही लुटता येणार आहे.