शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 28 जुलै 2014 (11:46 IST)

फ्लिपकार्टवर शाओमीचा Mi3 फक्त 40 मिनिटांत आऊट ऑफ स्टॉक

मंगळवारी दुपारी 12 वाजताच ‘शाओमी मी 3’ या स्मार्टफोनची ‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर विक्री सुरू होताच ही वेबसाइट क्रॅश झाली. यावर फ्लिपकार्टनं आपल्या फेसबुक पेजवर खरेदी करणार्‍यांना ज्या अडचणी येत आहेत त्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी3 या स्मार्टफोनचं लॉन्चिंग झाल्यामुळं आमची वेबसाइट व्यस्त चालत आहे. आम्ही लवकरच याला सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत, असं स्पष्ट करण्यात आलं. दुसरीकडे ‘शाओमी’ या कंपनीचा असा दावा आहे की विक्री सुरू होताच 39 मिनिटांमध्ये मी3 हा आउट ऑफ स्टॉक झाला.

कंपनीनं ‘मी इंडिया’या फेसबुक पेजवर असं म्हटलं आहे की तुम्ही दिलेल्या समर्थनामुळे आम्ही आपले आभारी आहोत आणि लवकरच फ्लिपकार्टसोबत आम्हीही या समस्येला दूर करण्याचा प्रयत्न करू. कंपनीनं फोनच्या विक्रीसाठी फ्लिपकार्टवर प्रि-बुकिंगची सुविधा केली होती पण तांत्रिक समस्येमुळं बहुतेक लोकं ते खरेदी करू शकले नाही. शाओमीनं भारतीय बाजारात आपला पहिला स्मार्टफोन मी3 लॉन्च केला आहे, ज्याची किंमत त्याच्या फीचर्सच्या हिशोबानं खूपच कमी म्हणजे केवळ 13,999 रुपये आहे. हा फोन सध्या फक्त फ्लिपकार्टवरच विक्रीसाठी उपलब्ध आहे.