शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

भारतात सॅमसंगने लॉन्च केले 2 नवे स्मार्टफोन्स

भारतात आपले दोन नवे फोन गॅलेक्सी ए5 आणि गॅलेक्सी ए7 स्मार्टफोन निर्माण करणार्‍या सॅमसंग कंपनीने भारतात लॉन्च केले आहेत. कंपनीने हे फोन मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये सुरु असलेल्या एका इव्हेंटमध्ये लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी ए5 ची किंमत 29,400 रुपये आहे तर गॅलेक्सी ए7 ची किंमत 33,400 रुपये आहे.
 
सॅमसंगने काही महिन्यांपूर्वीच आपल्या गॅलेक्सी ए5 आणि गॅलेक्सी ए7 या स्मार्टफोन्ची घोषणा केली होती. आता हे दोन्ही फोन्स भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. गॅलेक्सी सिरिजमधील या दोन्ही मॉडेल्सचे विविध फिचर्स एकसारखे आहेत.

गॅलेक्सी ए5 चा डिस्प्ले 5.2 तर गॅलेक्सी ए7 चा डिस्प्ले 5.5 इंच आहे. गॅलेक्सी ए5 मध्ये 2जीबी रॅम आणि 2900 मिलीअँम्पिअर क्षमतेची बॅटरी आहे, तर गॅलेक्सी ए7 मध्ये 3जीबी रॅम आणि 3300 मिलीअँम्पिअर क्षमतेची बॅटरी आहे.

दोन्ही मॉडेल्समध्ये ऑक्टॉकोअर एक्झीनॉस प्रोसेसर दिलेला आहे. यासोबतच 13 आणि 5 मेगापिक्सल्स कॅमेरेही दिलेले आहेत. फोन्सची इनबिल्ट स्टोअरेज क्षमता 16जीबी असून ते 128जीबी पर्यंत वाढविणे शक्य आहे.