शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2015 (16:44 IST)

माय एअरटेल मोबाइल अँप्लिकेशन पुन्हा सेवेत

भारती एअरटेल कंपनीने नव्या स्वरूपातील 'माय एअरटेल' हे मोबाइल अँप्लिकेशन पुन्हा सेवेत आणले आहे. हे अँप्लिकेशन अँड्रॉइडवरती रिडिझाइन करण्यात आले आहे, जेणेकरून युजरला सोपा आणि प्रभावी इंटरफेस देता येईल. या इंटरफेसमुळे ग्राहक अत्यंत सुविधाजनक पद्धतीने मोबाइल, फिक्स्ड लाइन आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवरती एअरटेलच्या सेवा पाहू, अनुभवू शकतील आणि स्वत:च त्यांचं व्यवस्थापनही करू शकतील. 'माय एअरटेल' या अँपच्या नव्या व्हर्जनमध्ये भरपूर ताजी फीचर्स आणि क्षमता आहेत आणि ग्राहकांना अधिक सुधारित डिजिटल अनुभव देण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टामध्ये ते बसणारे आहे. नवे 'माय एअरटेल' अँप्लिकेशन आता काही ठरावीक ग्राहकांपुरतेच र्मयादित असून येत्या काही दिवसांत ते सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

ग्राहक आता 'माय एअरटेल' अँपवरून कोणत्याही मोबाइल नंबरसाठी रिचार्ज करू शकतील आणि त्यावर त्यांना 'एअरटेल सरप्राइजेस'ची कूपन्स मिळतील. या कूपन्समध्ये अनेक आकर्षक ऑफर्स असतील. उदा. पहिल्या, वाढदिवसाच्या किंवा इतर आगामी आठवड्यांच्या किमतीची कूपन. देशातील मोठे कूपन आणि डिस्काऊण्ट मार्केटिंग प्लॅटफॉर्म असणार्‍या तसेच २00 शहरांमध्ये कार्यरत असणार्‍या 'मायडाला'बरोबर भागीदारी करत 'एअरटेल सरप्राइजेस'च्या माध्यमातून शॉपिंग, फूड, वेलनेस, मनोरंजन आदी क्षेत्रातल्या व्यापार्‍यांबरोबर खास टाय-अप्स करण्यात आले असून त्याद्वारे पीव्हीआर सिनेमाज, कॅफे कॉफी डे, फ्लिपकार्ट डॉट कॉम, अँमेझॉन डॉट इन, ईबे डॉट इन, मिंत्रा डॉट कॉम, आर्चिस, व्हीएलसीसी आदी ब्रॅण्ड्सची ऑफर कूपन दिली जातील. या अँपमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेले 'आय वॉण्ट टू' या फीचरमुळे ग्राहकांना त्यांच्याद्वारे नेहमी केली जाणारी कामे (विशिष्ट क्रमांकाच्या प्रीपेड मोबाइल नंबरसाठी रिचार्ज) अँप्लिकेशनच्या होमपेजवर जलद अँक्शन म्हणून नोंदवली जातील, त्यामुळे जवळपास शून्य कालावधीत त्यांची पुनरावृत्ती करता येते.
 
* एअरटेल मनी अपडेट लवकरच उपलब्ध केली जाईल
 
* नवे 'माय एअरटेल' अँप्लिकेशन लवकरच आयओएस आणि विण्डोज फोनसाठी उपलब्ध होईल
 
अँप्लिकेशनअंतर्गत रकमेचा भरणा करण्याचा अनुभव आणि कार्ड स्टोअर फीचर अपग्रेड करण्यात आली असून एअरटेलच्या पेमेण्ट पद्धतीला पीसीआय-डीएसएस सर्टिफिकेशन मिळाले आहे. त्यामुळे माय एअरटेल आणि पीसी आणि मोबाइल वेब अनुभवांदरम्यान ग्राहकांना सुरक्षित आणि जलदगत्या चेकआऊट करता येईल. पुश नोटिफिकेशन्समध्ये बॅलन्स कमी झाल्यास, पॅक एक्सपायरी आणि पेमेण्टची शेवटची तारीख ग्राहकांना या अँपमध्ये उपलब्ध असेल. त्या जोडीला 'माय एअरटेल'चा वापर करताना ग्राहकांना डेटा चार्जेस लागणार नाहीत.