बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 16 मे 2015 (11:32 IST)

लवकरच फेसबुकही सुरू करणार सर्च इंजिन

फेसबुक ही लोकप्रिय सोशल नेटवर्किग साईट लवकरच आपल्या यूजर्ससाठी सर्च इंजिन सुरू करणार आहे. मोबाइल अँपमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. या सर्च इंजिनच्या माध्यमातून यूजर्सना गुगलचा वापर करण्याची गरज भासणार नाही. यूजर्सना जेव्हा स्टेटस पोस्ट करताना इतर वेबसाइटही पाहता येण्यासाठी फेसबुकने ही सुविधा सुरू करण्याचे ठरवले आहे. सध्यातरी ही सुविधा सुरू करण्याबाबत फेसबुकची योजना प्राथमिक स्तरावर आहे.
 
टेकक्रंच या वेबसाइटच माहितीनुसार, फोटो, ठिकाण या फिचर्ससोबतच आणखी एक ऑप्शन असणार आहे, ते म्हणजे ‘अड ए लिंक’. याचा वापर करून थेट फेसबुकवरूनच काही गोष्टी तुम्ही सर्च करू शकणार आहात. शिवाय ‘अड ए लिंक’ बटणाने तुम्ही ती लिंक फेसबुकवर शेअरही करू शकणार आहात.