शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2015 (11:55 IST)

लॉन्च आधीच Moto G 3 फ्लिपकार्टवर लीक

मोटोरोलाचा थर्ड जनरेशन Moto G 3 हा स्मार्टफोन अजून लॉन्च व्हायचा आहे, परंतु भारतीय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने मोटो G 3 आधीच साईटवर चुकून लिस्टेड केला होता. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर वेबसाइटवरून हा फोन हटवण्यात आला. ई-कामर्स वेबसाइट फ्लिपकार्ट मोटोरोलाचा एक्सक्लूझिव्ह पार्टनर आणि फ्लिपकार्टद्वारे Moto G (थर्ड जेन) वेबसाइटवर लिस्टेट करण्यात आला होता. पण लवकरच तो वेबसाइटवरून हटवण्यात आला. सर्वात आधी याची माहिती Gadgetraid ने दिली होती. रिपोर्टनुसार नवा Moto G चं मॉडेल नंबर P3560D1K8 असून तो पांढर्‍या रंगात मिळेल आणि यात 8 GB ची इंटरनर स्टोअरेज असेल. फ्लिपकार्टने Moto G (थर्ड जेन) ची माहिती दिलेली नाही, पण न्यूज रिपोर्टनुसार Moto G (थर्ड जेन) मध्ये 5 किंवा 5.2 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले (1080*1920p), 1.7GHz क्वॉर्ड कोर स्नॅपड्रॅगन 610 प्रोसेसर, 2 GB रॅम आणि 4G नेटवर्क आहे.
 
Moto G डिसेंबर 2013 मध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि Moto G 2 सप्टेंबर 2014 मध्ये लॉन्च झाला होता. त्यामुळे Moto G 3 जून किंवा जुलैमध्ये लॉन्च होईल, असा अंदाज आहे.