शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 8 जुलै 2015 (12:06 IST)

व्हॉट्स अॅपच्या प्रायव्हसीसाठी

साईटवर प्रायव्हसी जपणं हे मोठं जिकिरीचं काम असतं. व्हॉट्स अॅपवरून तुमचा पर्सनल डेटा लीक होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. व्हॉट्स अॅपवर प्रायव्हसी कशी जपायची ते जाणून घेऊ या..
-> व्हॉट्स अॅप ओपन केल्यावर उजव्या बाजूच्या मेन्यूवर क्लिक करा. तुम्हाला स्टेटस दिसेल. 
-> या अॅप्शनमधून तुम्ही करंट स्टेटस चेंज किंवा सेट करू शकता, स्टेटस हाईड करायचं असेल तर सेटिंग्जमध्ये जा. 
अकाउंटमध्ये गेल्यावर प्रायव्हसी ऑप्शन दिसेल. प्रायव्हसीवर टॅप केल्यावर हू कॅन सी माय पर्सनल इन्फॉर्मेशन हे वाक्य दिसेल. याच्याखाली प्रोफाइल फोटो आणि स्टेटस हे ऑप्शन दिसतील. 
-> प्रोफाइल फोटोवर क्लिक केल्यावर एव्हरीवन, माय काँटॅक्ट, नोबडी हे तीन पर्याय उघडतील. तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा.
-> याच प्रकारे तुम्ही स्टेटसही लपवू शकता. यामुळे व्हॉट्स अॅप तुमची प्रायव्हसी जपली जाईल.