शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑगस्ट 2014 (22:02 IST)

'व्हॉट्सअँप’ करा मराठीत

व्हॉट्सअँपच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्रजीची फारशी जाण नसलेले लोकही त्याचा वापर करू लागले. त्यांना फोनचा मेन्यू मराठीमध्ये उपलब्ध होत असला तरी व्हॉट्सअँपचा मेन्यू मात्र इंग्रजीमध्येच येत होता. त्यामुळे व्हॉट्सअँपचे इतर फीचर वापरण्यार मर्यादा आल्या होत्या. ही अडचण ओळखून व्हॉट्सअँप लवकरच मेन्यू मराठीत उपलब्ध करून देणार आहे. व्हॉइस कॉल फीचरसोबतच ही सुविधाही ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते.

स्पर्धक कंपन्यांनी व्हॉइस कॉलिंगची सुविधा देऊ केल्यानंतर जून-जुलैअखेर व्हॉट्सअँपवरही व्हॉइस कॉलिंगची सुविधा देण्याची घोषणा कंपनीचा संस्थापक जॉन कोउमने काही महिन्यांपूर्वी केली होती. आता ऑगस्ट उजाडल्यानंतर अद्यापही या सुविधेची प्रतीक्षा असली, तरी व्हॉइस कॉलिंगसोबतच व्हॉट्सअँपचा मेन्यूही स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निश्चय कंपनीने केल्याचे दिसत आहे. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, तेलुगू, तमिळ, उर्दू यासारख्या भाषांमध्ये हा मेन्यू उपलब्ध होणार आहे. या भारतीय भाषांसह फ्रेंच, जर्मन, चिनी, हिब्रू, झेक यासारख्या 66 भाषांमध्ये मेन्यूचे भाषांतर कंपनीने सुरू केले आहे.

योगदानाची संधी एखाद्या भाषेची माहिती असणारी व्यक्ती कई सर्याक भाषेतील शब्दाला स्वत:च्या भाषेत अचूक पर्याय सांगू शकते. हे ओळखून कंपनीने सर्वसामान्यांनाच या भाषांतराच्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी दिली आहे. त्यासाठी http://translate.hatsapp.com ही लिंक ओपन केल्यावर फेसबुक, ट्विटर  किंवा गुगल अकाउंटद्वारे लॉगइन करावे लागते. त्यानंतर ज्या भाषेत भाषांतर करायचे ती भाषा यादीतून निवडल्यावर प्रोफाइल तयार होते. आतापर्यंत कोणकोणते मेन्यू भाषांतरित झाले आहेत, कोणाचे भाषांतर शिल्लक आहे. यासारखे पर्याय याठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर तुम्ही भाषांतर सुरू करू शकता. तसेच भाषांतरित झालेल्या मेन्यूच्या स्थानिक भाषेतील विविध पर्यायांपैकी योग्य वाटेल तो पर्याय निवड करण्याची संधी याठिकाणी उपलब्ध आहे.