गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

व्हॉट्सअॅप झाले फ्री !

इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्सकडून वार्षिक फीस वसुली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने वार्षिक सब्सक्रिप्शन बंद करण्याची घोषणा केली असून महसूलसाठी वैकल्पिक मॉडलचा शोध चालू आहे.
 
यापूर्वी काही देशांना सोडून जगभरात एका वर्षासाठी या अॅपला वापरण्यासाठी एक डॉलर वार्षिक शुल्क द्यावं लागत होतं.
 
कंपनीच्या आधिकारिक ब्लॉगपोस्टमध्ये सांगण्यात आले की अनेक व्हॉट्सअॅप यूजर्सजवळ क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नसतात. तसेच त्यांना भीती असते की एक वर्षांनंतर त्याचे व्हॉट्सअॅप बंद होऊन जाईल. यावर आम्ही गांभीर्यपूर्ण विचार करून अशा प्रकारे पैसे घेणे बंद केले आहे. त्यामुळे कोणत्याही यूजर्सला पैसे द्यावे लागणार नाही.